एकीकडे अजितदादांचे अंत्यसंस्कार दुसरीकडे सोनसाखळी चोरांनी साधला डाव ! बारामतीत काय घडलं

Feb 3, 2026 - 09:25
Feb 3, 2026 - 09:27
 0  873
एकीकडे अजितदादांचे अंत्यसंस्कार दुसरीकडे सोनसाखळी चोरांनी साधला डाव ! बारामतीत काय घडलं

आय मिरर 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारा वेळी भल्या मोठ्या गर्दीत गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा अंदाजे २० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामती तालुका पोलिसांनी सात चोरट्यांना अटक केली आहे.

राजकुमार बाबुराव आठवले , मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस , एजाज भगु मीरावले , मोहम्मद सादिक मोहम्मद गफार,बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे, तुषार कैलास मासाळ,नितीन अंकुश गायकवाड आदी आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक आली आहे. 

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिर्यादी रणजीत बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजीत अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजीत मधुकर भोंगळे व इतर यांच्या सोन्याच्या चैन रोख रक्कम असा अंदाजे २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गुन्हा दाखल होताच बारामती पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान राजकुमार बाबुराव आठवले (रा.तलवाडा ता.गेवराई, जि. बीड), मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस (रा. गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ), एजाज भगु मीरावले (रा.गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ), मोहम्मद सादिक मोहम्मद गफार (रा. मोतीनगर, डिग्रज, यवतमाळ),बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे (रा. इंदिरानगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर सध्या रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), तुषार कैलास मासाळ (रा.कोरडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), नितीन अंकुश गायकवाड (रा.शिक्षक कॉलनी, ता. बीड,जि.बीड) आदी आरोपींना अटक आली आहे. 

आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपासात पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार किशोर वीर, तसेच पोलीस अंमलदार राजू बन्ने, मनोज पवार, जितू शिंदे, हनुमंत खटके यांनी सहभाग घेतला आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow