धक्कादायक ! पोलीस असल्याचे सांगत महिलेवर बलात्कार... 

Aug 24, 2025 - 20:02
Aug 24, 2025 - 20:03
 0  1154
धक्कादायक ! पोलीस असल्याचे सांगत महिलेवर बलात्कार... 

आय मिरर 

दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे एकाने आपण पोलिस असल्याचे सांगत बतावणी करून महिले वरती बलात्कार केलाय. आरोपींने या पीडित महिलेस आपण पोलीस आहे तुझे घर तपासायचे आहे असं सांगत घराची तपासणी केली आणि त्यानंतर शेजारी असलेल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला अशा आशयाची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी दौंडू पोलिसात संतोष हडागळे याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 64, 204 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांना माध्यमाने विचारला असता त्यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. केवळ दौंड मध्येच नाही तर संपूर्ण राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे. मी हे म्हणत नाही तर केंद्र सरकारचा डेटा हे सांगतो, पोलीस खातं काय करतं असा सवाल ही सुळे यांनी उपस्थित केला.

 

देशात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे भाजपाचे सरकार आहे. मात्र असं असलं तरी दिवसेंदिवस महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असल्याचं सुळे यांनी म्हटलं असून केवळ पुणेच नाही तर संपूर्ण राज्यात क्राईम वाढत चालला असल्याचे त्यांनी म्हटल आहे.

दरम्यान या प्रकरणी दौंड पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow