दौंड शहरात मध्यरात्री दरोड्याच्या दोन घटना, रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लुटला

Nov 1, 2025 - 18:37
Nov 1, 2025 - 18:56
 0  1379
दौंड शहरात मध्यरात्री दरोड्याच्या दोन घटना, रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लुटला

आय मिरर 

दौंड शहरातील अहिल्यानगर मार्गावरील लोखंडे वस्ती परिसरात मध्यरात्री दुहेरी दरोड्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी सुमारे एक लाख रुपये रोख रक्कम पाच तोळे सोन्याचे दागिने यासह चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याची माहिती मिळत असून हे दरोडेखोर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.

पहिला दरोडा हिरालाल शाहूराव शिंदे यांच्या बंद बंगल्यावर पडला.पाच जणांच्या टोळीने मध्यरात्री दरवाजे तोडून घरात प्रवेश केला.चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नसून घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर काही अंतरावर असलेल्या दत्तात्रय सपकाळ यांच्या शेतातील बंगल्यावर देखील या अज्ञात चोरट्याने दरोडा टाकला.दरोडेखोरांनी सुमारे एक लाख रुपये रोख रक्कम पाच तोळे सोन्याचे दागिने यासह चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याची माहिती मिळाली आहे.

या संपूर्ण घटनेचा दौंड पोलीस आता तपास करत असून या घटनेमध्ये लाखो रुपयांचा ऐवज या अज्ञात दरोडेखोरांनी लंपास केला आहे. दौंड सारख्या गजबजलेल्या शहरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. मात्र या दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow