धक्कादायक ! बारामतीच्या गुणवडीत पाच वर्षाच्या चिमुकल्याचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू 

Aug 23, 2025 - 09:06
 0  196
धक्कादायक ! बारामतीच्या गुणवडीत पाच वर्षाच्या चिमुकल्याचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू 

आय मिरर 

बारामती शहरातून गुणवडी गावात घरी जात असताना टेम्पोखाली चिरडून पाच वर्षांच्या अथर्व निलेश लोंढे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.घाईगडबडीने रस्ता ओलांडत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.अपघातातील टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व आपल्या आजी समवेत बारामतीवरून गुणवडी येथे आला होता. घराजवळ आल्यानंतर तो आजीला मागे ठेवून घराकडे धावत जात असताना बारामतीकडून डोर्लेवाडी कडे जाणाऱ्या पियाजिओ टेम्पोखाली येऊन जागीच ठार झाला.

असा घडला अपघात...

मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय अथर्व हा त्याच्या आजीसोबत बाहेरगावी गेला होता. शुक्रवारी बाहेरगावाहून आजी आणि नातू दोघेही गुणवडीकडे आले.

एका रिक्षाद्वारे गुणवडीकडे पोहोचताना आजी रिक्षातून उतरण्यापूर्वीच कधी एकदा घरी जातो असं झालेल्या अथर्व हा आजी रिक्षातून उतरण्यापूर्वीच स्वतः रिक्षातून उतरत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बारामती बाजूकडून डोर्लेवाडीकडे निघालेल्या टेम्पोची त्याला जोरदार धडक बसली.

रस्ता ओलांडताना टेम्पोने दिलेल्या धडकेत अथर्व या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बारामती-डोर्लेवाडी रस्त्यावर गुणवडी गावच्या हद्दीत घडली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow