दादांच्या विरोधात बारामतीचा हा नेता करणार राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार, वाचा काय आहे प्रकरण
आय मिरर
बारामती पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चा संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवरती बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. यामध्ये बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांचा देखील समावेश आहे.मात्र हा गुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचं काळुराम चौधरी यांनी म्हटल आहे.
या संदर्भात आपण राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल करणार असून माझ्यावर दाखल झालेला गुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून आकसाने दाखल झाला आहे.अजित पवार यांनी घेतलेल्या गोपनेतेची शपथ आणि त्यांच्या पदाचा त्यांनी भंग केला आहे या विरोधात आपण त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचं काळुराम चौधरी यांनी म्हटल आहे.
जर राज्यपालांनी दखल घेतली नाही तर आपण न्यायालयात अजित पवारांच्या विरोधात दावा दाखल करणार असल्याचंही काळुराम चौधरी यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण...
राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रश्न 2 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करीत हैदराबाद गॅझेट लागू करत असल्याबाबतचा जीआर काढला. यानंतर सरकारच्या या निर्णयाला ओबीसी समाज बांधवांकडून विरोध दर्शवला जाऊ लागला. याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाबद्दल एक वक्तव्य केलं. याच वक्तव्याला धरून मनोज जरांगे पाटील यांच्या वरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी ओबीसी आंदोलकांकडून करण्यात आली होती.
जर पाच सप्टेंबर पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर पाच सप्टेंबरला आम्ही बारामती मध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात 5 सप्टेंबरला ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला बारामती पोलिसांनी ईद आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारली होती. या मोर्च्याची सांगता प्रशासकीय भावना समोरील जाहीर सभेने झाली. या जाहीर सभेत काळूराम चौधरी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. याच मुद्द्यावरून बारामती पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवरती गुन्हे दाखल केलेत.
What's Your Reaction?