दौंड मध्ये जमिनीच्या मोजणीवरून थेट कोयत्याने वार, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
आय मिरर
पुण्याच्या दौंड मधील स्वामी चिंचोली येथे जमीन मोजणीचा अर्ज दिल्याच्या कारणातून कोयत्याने वार झालेत. यामध्ये सुभाष शिंदे हे गंभीर जखमी झाले असून वाद सोडवण्यासाठी गेलेली सुभाष शिंदे यांची दोन्ही मुलं प्रशांत आणि राहुल यांना देखील मारहाण झाले असून ते देखील जखमी झालेत. सुभाष शिंदे यांचा मुलगा राहुल शिंदे यांचा तक्रारीवरून दौंड पोलिसात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिनी मोजणीच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर येत असून दौंड पोलीसात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय पोपट शिंदे,विजय पोपट शिंदे, स्वप्नाली संजय शिंदे,कविता पोपट शिंदे आणि पोपट किसन शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हे सर्वजण दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील गावचे रहिवासी आहेत.
जखमी सुभाष शिंदे यांनी भूमी अभिलेख विभागाकडे जमीन मोजणीसाठी अर्ज केला होता. यासंदर्भात हल्ला करणारे संजय शिंदे यांना नोटीस आली होती. याचा राग मनात धरून संजय शिंदे यांनी सुभाष शिंदे यांच्या घरी जाऊन मोजणीचा अर्ज का देतो ? तुझा अर्ज माघारी घे नाही तर तुझं कुटुंब संपवून टाकील म्हणत शिवीगाळ केली. यातूनच पुढे संजय शिंदे यांनी काही वेळातच कोयता घेऊन येत सुभाष शिंदे यांच्यावरती हल्ला चढवला. या हल्ल्यात सुभाष शिंदे गंभीर जखमी झाले.
दरम्यान सुभाष शिंदे यांची दोन्ही मुलं प्रशांत शिंदे आणि राहुल शिंदे हे वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांच्यावरही संजय शिंदे यांनी हल्ला चढवला. यामध्ये ते ही जखमी झाले आहेत, या वादावेळी संजय शिंदे यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींनी ही फिर्यादी यांना आणि त्यांच्या घरातील व्यक्तींना कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. दौंड पोलीस या संपूर्ण गुन्ह्याचा तपास करत आहेत.
What's Your Reaction?