दौंडच्या कुरकुंभमध्ये हायवा डंपरचा थरार...सुदैवानं जखमी विद्यार्थिनी थोडक्यात बचावली
आय मिरर
पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगात निघालेल्या एका हायवा डंपरने कुरकुंभ मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शाळकरी विद्यार्थिनीच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे.
ही मुलगी धडक बसल्यानंतर थेट पुढे दुचाकीसह रस्त्यावरती आपटली गेल्याचं व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत असून सुदैवानं या मुलीचा जीव वाचला गेलाय.
ही घटना घडताच चौकातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहन चालकाला वाहन पाठीमागे घ्यायला लावत मुलीला बाहेर काढलं. या घटनेत ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या पायाच हाड देखील मोडलं आहे.श्रावणी जाधव असं या जखमी मुलीचं नाव आहे.
या अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले असून, ग्रामस्थांनी गर्दीच्या भागात अवजड वाहनांचा प्रवेश रोखावा अशी मागणी केली आहे.
What's Your Reaction?