बिग ब्रेकिंग | राजू भाळे टोळीवर वालचंदनगर पोलिसांनी लावला मोक्का

Aug 14, 2025 - 07:31
Aug 14, 2025 - 07:38
 0  2757
बिग ब्रेकिंग | राजू भाळे टोळीवर वालचंदनगर पोलिसांनी लावला मोक्का

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूर आणि सोलापूरच्या माळशिरस परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत वाजवणाऱ्या राजू भाडे टोळीवर वालचंद नगर पोलिसांनी मोक्का लावलाय. सराईत गुन्हेगार राजू भाळे यांच्यासह तब्बल 13 जणांना विरोधात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे. यातील सर्व आरोपी सध्या जेलमध्ये आहेत.

27 फेब्रुवारी 2025 रोजी इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे श्रेय वादातून उत्तम जाधव याचा निर्घृण खून झाला होता. या प्रकरणात आरोपी राजेंद्र उर्फ राजू महादेव भाळे आणि त्याच्या सहकाऱ्यांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. 

वालचंदनगर पोलिसांनी राजू भाळे टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. टोळीप्रमुख भाळेसह १३ जणांविरोधात गुन्हे नोंदवले असून, धनाजी मसुगडे व निरंजन पवार यांच्यावर दुसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. 

या टोळीतील आरोपींवर खून, मारहाण व दहशत माजवण्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांची ही दहशत मोडीत काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी आता या राजू भाळे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

कोणा कोणावर लागला मोक्का...

१) राजेंद्र ऊर्फ राजु महादेव भाळे २) रामदास ऊर्फ रामा शिवाजी भाळे ३) नाना भागवत भाळे ४) निरंजन लहु पवार ५) तुकाराम ज्ञानदेव खरात सर्व इंदापूर तालुक्यातील खोरोची गावचे आहेत. ६) शुभम ऊर्फ दादा बापु आटोळे ७) अशोक बालु यादव ८) अक्षय भरत शिंगाडे तिघेही इंदापूर तालुक्यातील शेळगावचे आहेत.

 

९) स्वप्नील बबन वाघमोडे, रा. रेडणी, ता. इंदापुर १०) मयुर ऊर्फ जिजा मोहन पाटोळे, रा. निमसाखर, ता. इंदापुर ११) धनाजी गोविंद मसुगडे, रा. मौजे कारुंडे, ता. माळशिरस, जि. सोलापुर १२) सोमनाथ बबन पवार रा. कळंब, ता. इंदापुर, जि. पुणे आणि १३) सनि विलास हरिहर, रा.अंथुर्णे शेळगांव, ता.इंदापुर अशा तेरा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू महादेव भाळे व त्याच्या टोळीचे गुन्हेगारीचे पूर्व रेकॉर्ड पाहता आरोपी राजेंद्र भाळे याचेवर एकुण १२ गुन्हे, तसेच आरोपी रामदास भाळे, स्वप्नील वाघमोडे, मयुर ऊर्फ जिजा पाटोळे, अशोक यादव, सनि हरिहर यांचेवर प्रत्येकी ०२ गुन्हे, तर तुकाराम खरात, धनाजी मसुगडे, नाना भाळे याचेवर प्रत्येकी ०३ गुन्हे व निरंजन पवार याच्यावर ०५ गुन्हे दाखल असण्याचे पोलीस तपासात समोर आले.

तर धनाजी गोविंद मसुगडे व निरंजन लहु पवार यांचेवर या अगोदर वालचंदनगर पोलीस स्टेशन व दहिवडी पोलीस स्टेशन, सातारा यांनी सन २०१२ व २०१९ मध्ये मोक्का (मकोका) कायद्यांतर्गत कारवाई केली असुन सदर दोन्ही आरोपींवर दुसऱ्यांदा मोक्का (मकोका) अंतर्गत कारवाई झाली आहे.

प्रभारी पोलिस अधिकारी राजकुमार डुणगे प्रस्ताव ठरला महत्त्वाचा...

राजू भाळे टोळीची संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांकडे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सहमती देत हा प्रस्ताव पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांकडे पाठवला. त्यास सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली असून उत्तम जाधव यांच्या खून प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करत आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे, पोलीस उपनिरीक्षक मिलींद मिठापल्ली, स्था. गुन्हे शाखाचे महेश बनकर व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अभिजीत कळसकर, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील,जगदीश चौधर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर व कोर्ट अंमलदार प्रेमा सोनावणे, सचिन खुळे यांनी पार पाडली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow