जाब विचारायला गेलेल्या पुतण्याला बाप लेकाची मारहाण,तरुणाचा मृत्यू ! बारामतीतील प्रकार
आय मिरर
माझ्या जागेमध्ये बाथरूम का बांधलं ? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पुतण्याला बापलेकाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेत मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.सौरभ विष्णू इंगळे वय 24 वर्षे असं मृत युवकाचे नाव आहे.
बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती पोलिसांनी दोघाजणांना ताब्यात घेतलं असून याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी प्रमोद रामचंद्र इंगळे व रामचंद्र जगन्नाथ इंगळे या बापलेकांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
मयत सौरभ हा आपल्या जागेत बाथरूम का बांधले म्हणून विचारणा करावयास गेला होता. यावेळी प्रमोद रामचंद्र इंगळे व रामचंद्र जगन्नाथ इंगळे या बाप लेकाने त्याला बेदम मारहाण केली यात सौरभचा जीव गेला.
विशेष म्हणजे सौरभ ला मारहाण केल्यानंतर प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे हे दोघेजण तालुका पोलीस ठाण्यात येऊन सौरभ विरोधात फिर्याद देऊन गेले होते, मात्र या दरम्यान सौरभला त्याच्या चुलत भावांनी बारामतीत खाजगी दवाखान्यात आणले. दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?