Baramati टनभर ऊस अंगावर पडूनही दोघे सुखरूप वाचले ; देव तारी त्याला कोण मारी

Jan 19, 2026 - 14:17
Jan 19, 2026 - 14:20
 0  536
Baramati टनभर ऊस अंगावर पडूनही दोघे सुखरूप वाचले ; देव तारी त्याला कोण मारी

आय मिरर 

बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे ऊस भरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचा अचानक एक्सल तुटल्याने चाक तुटून ट्रॉली क्षणांत पलटी झाली. यावेळी शेजारून चाललेल्या दुचाकीवर तीन-चार टन ऊस कोसळला गेला.यात दोघे जण अडकले होते.

शेजारच्या चव्हाण वस्तीवरील ग्रामस्थांनी धावाधाव करत काही मिनिटांतच ऊस बाजूला केला आणि दुचाकीवरील बाप-लेकांना सुखरूप बाहेर काढले. युवराज काशिनाथ भिसे आणि काशिनाथ गोपाळा भिसे अशी जखमींची नावे असून हे दोघेही बारामती तालुक्यातील होळ येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 18 जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास ऊसतोड मजुरांचा डंपीग ट्रॅक्टर क्र. एम.एच. २५ ए.एस. ७६६५ हा ऊस भरलेली ट्रॉली घेऊन सोमेश्वर कारखान्याकडे निघाला होता. वाणेवाडी- होळ रस्त्यावरील अंबामाता मंदिराजवळच्या चढ चढत असताना अचानक ऊसाने भरलेल्या ट्रॉलीचा एक्सल तुटला आणि ऊसा सह ट्रॉली रस्तावर पडली.

याचवेळी वाणेवाडीकडून होळकडे निघालेल्या स्प्लेंडर दुकाची या उसाखाली सापडली.तर ट्रॉलीवरील उसावर बसलेले दोन ऊसतोड मजूर बाजूला फेकले गेले. मात्र, दुचाकी आणि त्यावरील दोघे उसाखाली अडकले. प्रवासी तरुण आणि शेजारच्या चव्हाण वस्तीवरील महिला आणि पुरुषांनी धावत येत कोयता, विळा, कुऱ्हाडीने पटापट ऊस कापून टाकला अन् ऊसाखाली सापडलेल्या दोघांना बाहेर काढले. जखमींना नजीकच्या रूग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow