बिग ब्रेकींग | वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

Apr 28, 2026 - 11:18
 0  682
बिग ब्रेकींग | वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

आय मिरर 

बारामती मधील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एका संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी ८ वाजता त्याने ही आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

 रवींद्र आनंदराव गार्डी असं आत्महत्या केलेल्या 55 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात वडगाव निंबाळकर पोलिसांनी रवींद्र गार्डी याला शनिवारी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आणि याच दरम्यान आज सकाळी आठ वाजता या आरोपींने पोलीस ठाण्यातच पांघरण्यासाठी दिलेल्या चादरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षाच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले होते. रवींद्र आनंदराव गार्डी असं या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून रवींद्र गार्डी हा त्याच्याच नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत होता अशी माहिती समोर येत आहे. यातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. पीडित मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संगनमताने फलटण मधील एका डॉक्टरच्या रुग्णालयात तिचा गर्भपात देखील करण्यात आला होता. अशी ही माहिती समोर येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow