मोठी बातमी | इंदापूरच्या भिगवणमध्ये 50 वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

Apr 28, 2026 - 06:57
Apr 28, 2026 - 07:04
 0  830
मोठी बातमी | इंदापूरच्या भिगवणमध्ये 50 वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये रविवार रात्री उशिरा गणेश जमदाडे यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात जमदाडे गंभीर जखमी झालेत. सध्या गणेश जमदाडे यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

मात्र या घटनेनंतर काल रात्री सोमवारी रात्री उशिरापर्यंत भिगवण पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली. 

जखमी व नातेवाईक पुण्यात असल्याने तक्रार नोंदवण्यास विलंब झाल्याचे कारण पोलिसांनी कडून सांगण्यात आले आहे.

काल सोमवारी रात्री उशिरा तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होईल व आरोपींचा शोध घेण्यात येईल असही पोलिसांनी सांगितले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow