बिग ब्रेकिंग | दिर्घ प्रतीक्षेनंतर उजनी धरण मायनस मधून प्लस मध्ये
आय मिरर
सोलापूर अहमदनगर यासह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मायनस मधून प्लस मध्ये आलं आहे.
21 जानेवारी 2024 रोजी उजनी धरण हे मायनस मध्ये गेल होतं, उजनीनं 44 वर्षाचा इतिहास मोडीत काढला होता. यावर्षी उजनी हे 60 टक्के मायनस मध्ये गेलं होतं त्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले होते. यंदाच्या पावसाळ्यात ते पुन्हा कधी प्लस मध्ये येणार याचे वेध सर्वांना लागले होते. अखेर आज शुक्रवारी सकाळी सव्वानऊ च्या सुमारास उजनी धरण मायनस मधून प्लस मध्ये आलं आहे.
सध्या उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून दीड लाख क्युसेक च्या आसपास पाण्याचा विसर्ग येतोय त्यामुळे उजनीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी आहे. ज्यावेळी उजनी धरण 100 टक्के भरते त्यावेळी 117 टीएमसी पाणीसाठा होतो. यापैकी 63 टीएमसी हा मृत साठा म्हणून गणला जातो तर 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो. उजनी 100 टक्के होण्यासाठी आणखीन 54 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
What's Your Reaction?