भिगवण मध्ये चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला महिलेचा मृतदेह ; उडाली एकच खळबळ
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाच्या हद्दीत पुलाखालील पाण्यात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला असून, मृत महिला अंदाजे २५ ते ३० वर्षांची असल्याचा अंदाज वर्तविला जातोय.मृत महिलेच्या डाव्या हातावर रविराज नावाचा टॅटू असून या मृत महिलेची ओळख अद्याप पटली नसून तिचा खून कोणी आणि का केला याचा सखोल तपास भिगवण पोलिस करत आहेत.
याबाबत कोणाला काही माहिती असल्यास भिगवण पोलिसांनी संपर्क साधावा असे आवाहन भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी केले आहे.
हा धक्कादायक प्रकार बुधावर दि.२२ रोजी दुपारनंतर उघडकीस आला आहे.त्यामुळे घटना समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.धक्कादायक बाब म्हणजे ही महिला सहा ते सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी प्राथमिक दृष्ट्या हा खुनाचा संशय व्यक्त केला आहे.मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने या खुनाचे गूढ उकलने हे देखील भिगवण पोलिसांसमोर मोठे आवाहन बनले आहे.
बातमी वाऱ्यासारखी पसरली...
बारामती भिगवण राज्यमार्गावर मदनवाडी पुल असुन, या पुलाच्या खालील बाजूस चादारीत गुंडाळलेल्या या अवस्थेत मृतदेह आढळला आहे या घटनेची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली अन् घटनास्थळी नागरिकांचीही गर्दी जमा झाली.पोलिस ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर ही महिला सहा सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पुढे येत आहे.
अंदाजे पाच सहा दिवसांपूर्वी चा हा मृतदेह असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आहे.या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिस अधिकचा तपास करत आहेत.मात्र हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना असल्याने मृतदेखाची ओळख पटल्यानंतरच पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती येतील.तोपर्यंत या खुनाचे गुढ कायम राहणार आहे.
What's Your Reaction?