बुलेट राजाला इंदापूर पोलिसांचा दणका, कर्कश्य आवाज करणारे सायलेन्सर थेट बुलडोझर खाली
आय मिरर
इंदापूर पोलिसांनी बुलेट राजांना मोठा दणका दिलाय. कर्कश्य आवाज करणाऱ्या 35 बुलेट दुचाकी वरती इंदापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या बुलेट दुचाकींच्या सायलेन्सर वर थेट इंदापूर पोलिसांनी बुलडोझर चालवला आहे. या कारवाईतून इंदापूर पोलिसांनी तब्बल 35 हजार रुपयांचा दंड देखील वसूल केला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांनी दिली.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे,पो.कॉ.अनिल नागरगोजे,पो.कॉ.सुहास आरणे, पो.कॉ.अमोल खाडे,पो.कॉ.पद्मसिंह शिंदे,पो.कॉ.अकबर शेख,म.पो.कॉ.पोल शोभा खरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राठोड म्हणाले की,काही तरुण गाडीचे सायलेन्सर बदलून प्रकाश आवाज करणारे सायलेन्सरद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात या अनुषंगाने आजची ही कारवाई केली आहे.
यासोबतच एक जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान इंदापूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने नो पार्किंगचे 156 गुन्हे, ट्रिपल सीट चे 11 गुन्हे, सायलेन्सर बदलण्याचे 65 गुन्हे, काळया काचांचे 55 गुन्हे तर नंबर प्लेट नसल्याचे 40 गुन्हे दाखल केले आहेत.
संपूर्ण इंदापूरकरांना सूचना वाचा एक विनंती करायची आहे की, अशा पद्धतीने जर तुम्ही गाड्या चालवत असाल तर यापुढे देखील ही कारवाई आणखीन कठोर करणार आहोत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी पालन करावं.
What's Your Reaction?