निरा डावा कालव्याला इंदापूरच्या वरकुटे खुर्द मध्ये भगदाड, शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं पाणी

Oct 9, 2024 - 19:48
 0  186
निरा डावा कालव्याला इंदापूरच्या वरकुटे खुर्द मध्ये भगदाड, शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं पाणी

आय मिरर

वरकुटे खुर्द येथील तलावात पाणी जाणारा कालवा फुटला गेला आहे. पाठीमागील काळातही या ठिकाणी कालवा फुटला होतो.आता पुन्हा एकदा या ठिकाणी मातीचा भरवा खचल्याने कालवा फुटला गेला आहेकालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

नीरा डाव्या कालव्यातून इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द तलावात तलाव भरण्यासाठी पाणी सुरू होते.रात्री अचानक पाणी वाढल्याने एका ठिकाणी कॅनल ओसंडून वाहू लागला व माती भरावा खचून तो फुटला गेला.

मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरले तसेच भोंगळे वस्ती येतील मच्छिंद्र भोंगळे यांचे घर कोसळून त्यांना दुखापतही झालीय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow