पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ, दौंडच्या यवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निखिल रणदिवे बेपत्ता, व्हाट्सअप स्टेटस मधून धक्कादायक खुलासे...
आय मिरर
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे आज दुपारपासून बेपत्ता झाले. यवत पोलिसांकडून निखिल रणदिवे यांचा शोध घेतला जातोय सध्या त्यांचा मोबाईल देखील बंद येतोय. निखिल रणदिवे हे यवत पोलीस ठाण्यांतर्गत असणाऱ्या केडगाव पोलीस चौकीला कार्यरत होते.
निखिल रणदिवे यांनी त्यांच्या मुलीचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवत एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्यातून त्यांनी पोलीस खात्यावर आणि यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली 1 वर्ष पासुन सतत त्रास देत आहेत. माझा नाई विलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे.असा गंभीर आरोप रणदिवे यांनी केला आहे. आज दुपारपासून रणदिवे यांचा मोबाईल बंद असून ते अद्याप पर्यंत मिळून आलेले नाहीत त्यामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. माझ्यात आणि रणदिवे यांच्यामध्ये कोणतेही गैरसमज नव्हते मतभेद नव्हते. मी कधीही त्यांना त्रास देत नव्हतो, मागील काही दिवसापूर्वी त्यांची शिक्रापूर येथे विनंती अर्जाने बदली झाली होती, मात्र त्यांच्याकडे काही दाखल गुन्ह्यातील कामकाज पूर्ण करणे बाकी होते ते पूर्ण करून त्यांना आपण सोडणार होतो. सध्या रणदिवे यांच्या शोधकामी पोलीस पथक रवाना केली असून त्यांचा आम्ही शोध घेत आहोत असं देशमुख यांनी म्हटल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निखिल रणदिवे यांची मागील काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे बदली झाली होती मात्र यवत पोलिसांकडून निखिल रणदिवे यांना सोडण्यात आलं नव्हतं, त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते तणावात होते. सध्या त्यांचं कुटुंब देखील शिक्रापूर येथे त्यांनी शिफ्ट केलं होतं.
व्हाट्सअप स्टेटस ला नेमकं काय लिहिलं आहे ते पाहूया....
माझी प्रिय दिदी,
आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्टांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसापूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पीटल मध्ये धेवुन जाता आले नाही. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली ०१ वर्ष पासुन सतत त्रास देत आहे. माझा नाई विलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझेकडुन दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा...केलेल्या कामाची पोच पावती आहे..भावपूर्ण श्रद्धांजली Niks
What's Your Reaction?