BIG BREAKING इंदापुरात ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू
आय मिरर
पुण्याच्या इंदापुरात भिगवण बारामती राज्यमार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत रात्री साडेदाहा च्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालकाचा देखील आगीमुळे मृत्यू झालाय तर दोन्ही वाहन जळून खाक झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भिगवन च्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टरचा आणि बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला, या अपघातात काही समजण्याच्या आत दोन्ही वाहनांनी पेट घेतला.
हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर हा ट्रकच्या खाली शिरल्याने ट्रॅक्टरचे दोन भाग झाले, यामध्ये ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर मध्ये अडकून राहिला.या अपघातात ट्रकचाही दाबा सुटला आणि ट्रक उलटला. ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर मध्ये अडकल्याने त्याचा या आगीमध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला. तर घटनास्थळी ट्रक चालक मात्र आढळून आला नाही.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहिती नुसार ट्रक चालक बचावासाठी तिथून पळून गेल्याचा अंदाज लावला जातोय. संपूर्ण घटनेमध्ये दोन्हीही वाहणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, ट्रक आणि ट्रॅक्टरसह दोन्ही वाहन या आगीमध्ये जळून भस्म झाली आहेत.
यावेळी भिगवण बारामती मार्गावर दोन तासाहून अधिक काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, घटनास्थळी भिगवण पोलिसांनी आणि अग्निशामक दलाने तात्काळ धाव घेत संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणली असली, तरी या आगीमध्ये दुर्दैवानं ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू झालाय.याबाबत भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास भिगवण पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?