काटी लाखेवाडीसाठी आज श्रीमंत ढोले दाखल करणार उमेदवारी ! दादा मामा भाऊंची ताकद ढोलेंच्या पाठीशी
आय मिरर
संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पुण्याच्या इंदापूर मध्ये देखील दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. तालुक्याचे लक्ष असलेल्या काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज सकाळी दहा वाजता मोठं शक्ती प्रदर्शन करत श्रीमंत ढोले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती करिता उमेदवारी दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महानगरपालिकातील समीकरणानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक साठी दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या असून या बाराही जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठी टक्कर दिली जाणार आहे.
पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये देखील विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्र आले असून या दोघांमुळे इंदापुरात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे गेली 19 वर्ष राष्ट्रवादीसोबत राहिलेले प्रदीप गारटकर हे आता भाजपमध्ये दाखल झाल्याने इंदापुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
दादा मामा भाऊंची ताकद ढोलेंच्या पाठीशी...
काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद श्रीमंत ढोले यांच्या नावावर एक महिन्यापूर्वीच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. अजित पवार यांनी श्रीमंत ढोले यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच श्रीमंत ढोले यांनी प्रचाराचा पहिला राऊंड देखील पूर्ण केला आहे. त्यामुळे या गटात राष्ट्रवादी काँग्रेस विजयी पताका फडकणार हे निश्चित मानले जात आहे.
श्रीमंत ढोले हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एक दिग्गज नेते समजले जातात. जिल्हा परिषदेचे नेतृत्वही श्रीमंत ढोले यांनी केलेलं असून त्यांच्या पत्नी चित्रलेखा ढोले या लाखेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील या तीन दिग्गज नेत्यांची ताकद आता श्रीमंत ढोले यांच्या पाठीशी असणार आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय.
राष्ट्रवादी काँग्रेस ने त्यांना काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटासाठी संधी दिली असून सध्या श्रीमंत ढोले हे जिल्हा परिषद गटातील विविध गावांचे गाव भेट दौरे करत असून मतदारांशी हितगुज करत आहेत. या प्रचार दौऱ्या दरम्यान श्रीमंत ढोले यांना मतदारांकडून तितकाच सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे. एका हाकेला सहज उपलब्ध होणारा आणि सर्वसामान्यात मिसळून जनतेला आपलं मानणारा आपल्या हक्काचा पुन्हा एकदा जिल्हा परिषद सभागृहात पाठवायचा आहे अशी खुणगाट मनाशी बांधून ढोले यांचे हजारो समर्थक निवडणुकीच्या रणांगणात आता उतरले आहेत.
लाखेवाडी सह पंचक्रोशीत श्रीमंत ढोले यांच्या राजकीय कारकिर्दीचा दबदबा असून जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखेवाडी सारख्या माळरानावर ढोले कुटुंबांना शिक्षणाची दारे खुली केली. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काटी लाकेवाडी जिल्हा परिषद गटा व्यतिरिक्तही इंदापूर तालुक्याच्या सर्व दूर सामान्य नागरिकांशी ढोले कुटुंबाची नाळ जोडली गेली आहे.
जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी अँड ज्युनिअर कॉलेज च्या माध्यमातून तालुक्यातील आणि तालुक्याच्या बाहेर हजारो विद्यार्थी या ठिकाणी उच्च प्रतीचे शिक्षण घेत आहेत. राजकारण एका जागी आणि समाजकारण एका जागी या तत्त्वावर चालणारा ढोले परिवार इंदापूरच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिला. केवळ नावापुरताच चर्चेत राहिला नाही तर उत्तम शिक्षण संस्था चालक यासोबत एक उत्तम राजकारणी कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं.
विद्यार्थ्यांच हित डोळ्यासमोर ठेवून श्रीमंत ढोले आणि ढोले परिवाराने लाखेवाडीच्या माळरानावर फुलवलेलं शिक्षणाचं दालन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अतिशय बारकाईने आणि निरखून पाहिले आणि ढोले परिवारांने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाचं तोंड भरून कौतुक केलं होतं.परिसरात उत्तम शेतकरी म्हणून ते प्रचलित आहेतच याशिवाय एक उत्कृष्ट संस्थाचालक कसा असावा याच मूर्तीमंत उदाहरण म्हणून ही त्यांच्याकडे पाहिलं जातं.
शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रति वर्षी मल्हार महोत्सव आयोजित केले जाते.केवळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा हेतू डोळ्यासमोर न ठेवता या महोत्सवाच्या निमित्ताने आयएएस आयपीएस यासोबतच नावलौकिक असलेले प्रशासकीय अधिकारी यांना विशेष आमंत्रित करून या महोत्सवातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक दिशा देण्याचे कामही या परिवाराच्या माध्यमातून केलं जातं. आणि या सर्व गोष्टींमुळेच अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून श्रीमंत ढोले यांची ओळख निर्माण झाली आहे.
What's Your Reaction?