मोठी बातमी | दौंडच्या हॉटेल जगदंबा मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट ; दहा जखमी सहा जणांची प्रकृती चिंताजनक...
आय मिरर
पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटस अष्टविनायक महामार्गावरील प्रसिद्ध असणाऱ्या जगदंबा हॉटेल मध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत एकूण दहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.दरम्यान, दौंड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून ही आग नियंत्रणात आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. हॉटेलच्या किचनमध्ये असणाऱ्या गॅस सिलेंडरचा अचानक भला मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की अक्षरशा आगीचे लोट बाहेर पडले.
अंगाचा थरकाप उडवणारी ही संपूर्ण घटना समोरच्या बाजूला असणाऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली आहे.
या दुर्घटनेमध्ये तब्बल 10 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. यापैकी सहा व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असल्याने त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तर चार व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर दौंड मध्येच शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत अशी ही माहिती समोर येत आहे.
एकंदरीत जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांसह दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेची सामग्री देखील ताब्यात घेतली असून ही घटना नेमकी कोणत्या कारणाने झाली असावी याचा सखोल तपासाता दौंड पोलिसांकडून केला जातोय.
What's Your Reaction?