हे घे शंभर...तिच्यावर रेप कर अन् तिला मारून टाक, अल्पवयीन पोरांनी नववीतील अल्पवयीन पोरालाच दिली अल्पवयीन विद्यार्थिनीची सुपारी ; मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल ! दौंड मध्ये काय घडलं ?

Jan 28, 2025 - 17:10
Jan 28, 2025 - 17:18
 0  744
हे घे शंभर...तिच्यावर रेप कर अन् तिला मारून टाक, अल्पवयीन पोरांनी नववीतील अल्पवयीन पोरालाच दिली अल्पवयीन विद्यार्थिनीची सुपारी ; मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल ! दौंड मध्ये काय घडलं ?

आय मिरर

बातमी आहे पुण्याच्या दौंड मधून विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याच शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी चक्क १०० रुपयांची सुपारी त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

बुधवारी 22 जानेवारी रोजी दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा खळबळ जनक प्रकार घडला.मात्र,आपल्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला गेला.

मात्र विद्यार्थिनींने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक व शिक्षिका, अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

दौड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा सर्व प्रकार घडला आहे. वर्गातील एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. ती सही त्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने पाहिली होती. याची माहिती तिने वर्गशिक्षिकेला दिली. याचा राग संबंधित विद्यार्थ्यांने मनात धरला होता.संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संबंधित विद्यार्थिनीवर अगोदर बलात्कार कर आणि नंतर तिला मारून टाक यासाठी १०० रुपयांची सुपारी दिली.

मात्र, ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी दिली त्या विद्यार्थ्याने ही सर्व घटना त्या विद्यार्थिनीला येऊन सांगितली. त्यानंतर या विद्यार्थिनीने तिच्या घरी याची माहिती दिली. या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणे गाठले.यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow