वालचंदनगर मधून पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह तरुण ताब्यात ; एलसीबीची कारवाई
आय मिरर
वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. ओंकार उर्फ नाना सोमनाथ देशमुख, रा. जंक्शन, ता. इंदापूर, हा नीलमणी मंगल कार्यालयाजवळ पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं.
अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना खबऱ्यामार्फत ओंकार उर्फ नाना सोमनाथ देशमुख हा नीलमणी मंगल कार्यालयजवळ गावठी पिस्टल जवळ बाळगून उभा राहिल्याची टीप मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून शिताफीने त्यास ताब्यात घेतले. अंगझडती मध्ये त्याचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतूस असा एकूण 30,200/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
पोलिस अंमलदार तुषार चव्हाण यांनी ओंकार उर्फ नाना सोमनाथ देशमुख यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 अन्वये फिर्याद दिली असून त्याचेवर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई सुधीर वाळुंज,सहा.पो.फौज. शिवाजी निकम,पो हवा किशोर तेलंग,पो हवा शैलेश स्वामी,पो हवा गुलाब पाटील,पो अंमलदार गणेश डेरे,पो अंमलदार तुषार चव्हाण यांनी केली आहे.
What's Your Reaction?