यवत मध्ये भरधाव कार रस्ता ओलांडून दुसऱ्या कारला धडकली,दोघांचा मृत्यू पाच जखमी
आय मिरर
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलिस स्टेशन हद्दीत दोन कारची भीषण धडक झाली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत.अशोक विश्वनाथ थोरबोले आणि गणेश दोरगे अशी मृतांची नावे आहेत.
या अपघाताबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश भोसले हा आपल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने पुणे-सोलापूर महामार्गावरून निष्काळजीपणे व नियमांचे उल्लंघन करून वेगाने जात होता, यावेळी त्याने उरुळीकडे जात असणाऱ्या स्विफ्ट डिझायर या गाडीला समोरासमोर धडक दिली यात दोघांचा मृत्यू झाला.
अशी घडली घटना...
राकेश मारुती भोसले रा. बोरीभडक ता.दौंड हा त्याच्या स्विफ्ट गाडी क्रमांक MH 12 V 5012 ने भरधाव वेगात निघाला होता.दरम्यान दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 12 TY 7931 या गाडीला धडक दिली.या धडकेत स्विफ्ट डिझायर गाडीतील अशोक विश्वनाथ थोरबोले (वय ५७, रा. उरुळी कांचन) व स्विफ्ट गाडीतील गणेश दोरगे (वय २८, रा. यवत) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले आहेत.जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातात हुंडाई आय-२० MH 12 NU 5501 गाडीचेही नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य केले.
या प्रकरणी यवत पोलिसांनी ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी राकेश मारुती भोसले यांचेवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.वेगमर्यादा तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिला.
What's Your Reaction?