दौंडमध्ये विद्यार्थ्यावर कटर आणि फायटरने वार…५ आरोपींसह अन्य दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sep 6, 2025 - 18:06
Sep 6, 2025 - 18:12
 0  1565
दौंडमध्ये विद्यार्थ्यावर कटर आणि फायटरने वार…५ आरोपींसह अन्य दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आय मिरर 

दौंड शहरात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.खुर्चीवर बसण्याच्या वादातून झालेल्या या प्रकरणात जवाद शेख आणि त्याच्या साथीदारांनी पीडित विद्यार्थ्यावर फायटर आणि कटर सारख्या धारदार शस्त्रांनी वार केलेत.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रितेश वाघेला असं जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून या हल्ल्यात त्याचे नाक फ्रॅक्चर झाले आहे. रितेश हा दौंड मधील लेट के.जी.कटारिया कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतो.आणि त्याच ठिकाणी खुर्चीवर बसण्याच्या वरून रितेश आणि जवाद शेख याच्या भांडण झाले त्यातूनच रितेश ला कॉलेजच्या बाहेर आणत रस्त्यावर मारहाण करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

या प्रकरणी जवाद शेख, अरमान शेख, फरान शेख, मोन्या शेख आणि इरशाद शेख यांच्यासह अन्य अनोळखी १० ते १५ इसमांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भिगवण पोलीस स्टेशनच्या गेटवरच दोन गटात वाद,चौदा जणांवर गुन्हा दाखल...

इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस स्टेशनच्या गेटसमोर दोन गटात मोठा वाद झाला आहे.हॉटेलच्या पैशाच्या व्यवहारातून पोलीस ठाण्याच्या गेट समोरच भर रस्त्यावर दोन गट आमने-सामने भिडले. एकमेकात शिवीगाळ दमदाटी होऊन हवा चिघळला गेला या प्रकरणात भिगवण पोलिसांनी तात्काळ 14 जणांवरती गुन्हा दाखल केला असून आणखीन सात ते आठ जणांचा शोध घेतला जातोय.

दौंड तालुक्याच्या हद्दीत शेतकरी नावाचा हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या व्यवसायाच्या हिशोबावरून वादाला सुरुवात झाली त्यानंतर हा वाद अगदीच भिगवण पोलीस ठाण्याच्या गेट समोर पोहोचला. यानंतर भिगवण पोलिसांनी शांततेचा भंग केल्याप्रकरणी या 14 जणांवरती गुन्हे दाखल केले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow