राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूर दौऱ्यावर,लाखेवाडीत पार पडणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

Mar 14, 2026 - 07:16
Mar 14, 2026 - 07:23
 0  919
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूर दौऱ्यावर,लाखेवाडीत पार पडणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

आय मिरर 

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूर दौऱ्यावर आहेत.इंदापूरच्या लाखेवाडी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडणार आहे.या उपक्रमांतर्गत प्रशासकीय कामांचा निपटारा हा एकाच ठिकाणी होणार आहे.सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम असणार आहे.

प्रशासकीय कामांचा निपटारा हा एकाच ठिकाणी होण्यासाठी आणि नागरिकांच्या अडीअडचणी तत्काला सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषदेचे गट नेते श्रीमंत ढोले आणि महसूल विभागाच्या पुआधाकरातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हाधिकारी राजेंद्र डूडी, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर इंदापूरचे तहसीलदार जीवन  बनसुडे यांसह विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

 कोणत्या योजनांचा शिबिरात समावेश...

1) प्रलंबित फेरफार

२) ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती

३) डिजीटल ७/१२ व ८अ उताऱ्याचे वाटप करणे

४) तुकडेबंदी नियमितीकरण करणे

५) वर्ग २ च्या जमीन वर्ग १ प्रकरणे

६) भूसंपादन कमी जास्त पत्रक तयार

७) अकृषिका-कमी जास्त पत्रक तयार

८) अकृषिक तरतुदीची सुधारणानुसार अधिमुल्य वसुल करणे

९) लोकसेवा हक कायदा

अ) जात प्रमाणपत्र

ब) नॉन क्रिमीलेअर

क) उत्पात्राचा दाखला

ड) रहिवास/अधिवास प्रमाणपत्र

१०) सामाजिक लाभाच्या योजना

अ) संजय गांधी

ब) इंदिरा गांधी योजना

११) एक खिडकी योजना

अ) ई-मोजणी

ब) ऑग्रीस्टॅक

क) पी. एम. किसान

ड) तक्रार निवारण

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow