जय मल्हार फेम देवदत्त नागे खंडोबाच्या नगरीत बांधणार घर ! थेट घरातून खंडोबाच्या गडाचे दर्शन...

Aug 19, 2025 - 15:16
 0  395
जय मल्हार फेम देवदत्त नागे खंडोबाच्या नगरीत बांधणार घर ! थेट घरातून खंडोबाच्या गडाचे दर्शन...

आय मिरर,राहुल शिंदे

'जय मल्हार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला आणि खंडेरायाच्या भूमिकेतून प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता देवदत्त नागे आता खऱ्या अर्थाने खंडोबाच्या नगरीत आपली ओळख निर्माण करणार आहे. देवदत्तने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे,देवदत्त नागे जेजुरीतच स्वतःचं घर बांधणार आहे.नुकताच जेजुरीच्या माजी नागराध्यक्ष अमृता घोणे यांच्या हस्ते झाला देवदत्तच्या घरच्या बांधकामाचा शुभारंभ पार पडला आहे.

थेट घरातून खंडोबाच्या गडाचे दर्शन..!

देवदत्त नागे याने जेजुरी मध्ये गडाच्या पायथ्याशी जमिनीचा तुकडा विकत घेतला असून, या ठिकाणावरून थेट खंडेरायाच्या गडाचं दर्शन होणार आहे. हेच त्याच्या नव्या घराचं वैशिष्ट्य ठरणार आहे. घराच्या घराच्या बांधकामचा भूमिपूजन सोहळा नुकताच जेजुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अमृता घोणे व जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त संदीप घोणे या उभायातांच्या हस्ते पार पडला.

अमृता घोणे यांचं माहेर अलिबाग आहॆ तर देवदत्त नागे याच मुळगाव ही अलिबाग आहॆ. त्यामुळे नागे आणि घोणे यांचं बहीण भावाच नातं आहॆ.बहिणीच्या हस्ते बांधकामचा शुभारंभ व्हावा अशी इच्छा नागे यांनी व्यक्त केली होती.

खंडेरायाच्या कृपेचा आशीर्वाद...

घरबांधणीच्या या शुभमुहूर्तानिमित्ताने देवदत्त नागे म्हणाला की,"श्री खंडेरायांच्या कृपेने त्यांच्या सान्निध्यात घर बांधण्याचं भाग्य लाभलं आहे. आता त्यांच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळणार आहे."

चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव...

या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी देवदत्त नागेवर शुभेच्छांचा वर्षाव केला. “जय मल्हार” मालिकेतील आठवणींना उजाळा देत अनेकांनी अभिनेत्याला खंडोबाच्या नगरीतल्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेक्षकांच्या मनात आजही ‘खंडेराया’ची प्रतिमा जिवंत असलेला देवदत्त नागे, आता जेजुरीत नवं घर बांधत असल्याने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भावविश्वाशी जोडला गेला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow