कारमधून जीव घेणी स्टंटबाजी करणं पडलं महागात,इंदापूर पोलीसांनी दाखल केला गुन्हा

Sep 18, 2024 - 14:31
Sep 18, 2024 - 14:40
 0  566
कारमधून जीव घेणी स्टंटबाजी करणं पडलं महागात,इंदापूर पोलीसांनी दाखल केला गुन्हा

आय मिरर

इंदापूर शहरात जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर चारचाकी वाहनातून स्टंटबाजी करणाऱ्या सात जणांविरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. इंदापूर शहरातून दोन चार चाकी कार मधून स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता आणि यानंतर इंदापूर पोलिसांनी या सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस हवालदार लक्ष्मण पोपट साळवे यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल झाला असून सोमवार दि.16 सप्टेंबर रोजी रात्री इंदापूर शहरातील जुन्या पुणे - सोलापूर महामार्गावरील तुळजाभवानीचे मंदिराच्या समोर ह्युडाई कंपनीचे व्हेन्यु मॉडेलचे वाहन (नंबर MH42 BJ 6740) मध्ये चालक व 3 तरुण तसेच दुसरे काळे रंगाचे चार चाकी वाहन (नंबर नसलेले) त्यामध्ये चालक व 2 तरुण असे एकूण सात जण यांनी स्वताचे व इतरांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे पध्दतीने धोकादायक परस्थितीत वाहनाचे खिडकीचे बाहेर लटकुन मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत स्टंटबाजी करीत सार्वजनिक शांततेचा भंग केला.तसेच वाहने भरधाव वेगात चालवुन रस्ता वाहतुकीचे नियंमानकडे दुर्लक्ष करीत केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow