शहा परिवाराकडून आजही वारकरी सांप्रदाय परंपरेची जपणूक ! इंदापूरात हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरवात

Sep 18, 2024 - 15:04
 0  404
शहा परिवाराकडून आजही वारकरी सांप्रदाय परंपरेची जपणूक ! इंदापूरात हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरवात

आय मिरर

इंदापूर च्या शहा परिवाराने पुर्वी पासून आजरेकर फडास योगदान दिले आहे.या परंपरेची जपणूक शहा परिवाराने आजही कायम ठेवली आहे. यावर्षीही श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड, पंढरपूर -आळंदी २०५वर्षे पूर्ती, जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा तसेच श्रीगुरु नामदेव आण्णा माळी वसेकर यांची ११३ वी पुण्यतिथी निमित्त इंदापूरात मंगळवार दि.17 सप्टेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती पुण्यतिथी उत्सव समितीचे अध्यक्ष भरत शहा यांनी दिली.

इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे आजपासून (दि.१७) सुरू होणाऱ्या अखंड सप्ताह काळात किर्तन सेवा,हरीपाठ प्रवचन सेवा होणार आहे.याकाळात विविध किर्तनकारांच्या किर्तन सेवा पार पडतील.सोमवारी (दि.२३)हभप श्रीगुरु हरिदास बोराटे आजरेकर यांचे काल्याचे किर्तन होईल.

आजरेकर फड व शहा कुटुंबाचा जुना ऋणानुबंध आहे.श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड, पंढरपूर-आळंदी या संस्थेचे ह.भ.प. नारायणदासजी शहा (बाप्पा )हे खजिनदार होते. ती परंपरा विद्यमान फड प्रमुख श्रीगुरू ह.भ. प. हरिदास रामभाऊ बोराटे तथा काका माऊली यांच्या रुपाने कायम राखली गेली. नारायणदास शहा बाप्पाच्या मागे त्यांचा वारकरी सांप्रदाय परंपरा जोपासणारे गोकुळदास (भाई) आणि पुढे ह.भ.प. भरतशेठ शहा यांनी इंदापूर हरीनाम साप्ताहाची धुरा सांभाळून दाखवून आजरेकर फडा प्रति असणारी श्रद्धा आणि आपुलकीचे नाते दृढ केल्याचे दिसते. या साप्ताहा मध्ये फडाचे सांप्रदायी अखंड महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आदी राज्यातून सहभागी झाले आहेत. त्यांची राहण्याची व इतर सोय आयोजक व उत्सव समितीचे अध्यक्ष भरतशेठ शहा यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow