इंदापूरच्या भिगवण मधून 21 वर्षे तरुणीचे अपहरण ; घटनेच्या निषेधार्थ जाळपोळ रास्ता रोको अन् आज भिगवण शहर बंदची हाक
आय मिरर
पुण्याच्या भिगवण मधून काल 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झालेलं आहे अद्याप पर्यंत तिचा शोध लागलेला नाही. दोन मुस्लिम तरुणांनी या मुलीचं अपहरण केल्याची तक्रार भिगवण पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज भिगवण शहर बंदची हाक देण्यात आली आहे. पोलिसांनी त्वरित या आरोपींना अटक करावी आणि त्यांच्यावर कोठोरातील कठोर शासन व्हावं या मागणीसाठी आज भिगवन शहर पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे.
याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जहीर हारून शेख आणि आयन हारून शेख अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे मुलीचे अपहरण करणारे दोघे सख्खे भाऊ आहेत.
या संपूर्ण घटने प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. संबंधित तरुणीचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली असून काही पोलीस पथके देखील शोधासाठी रवाना केली आहेत.
दरम्यान मुलीचा शोध लागत नाही तोपर्यंत मुलीच्या नातलगांनी भिगवण पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता,संतप्त ग्रामस्थांनी पुणे सोलापूर महामार्गावर जाळपोळ करीत मार्ग रोखून धरला होता.
शिवाय आता हे प्रकरण अधिकच तापले असून आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर देखील भिगवण मध्ये येणार असून आज भिगवण बंद ची हाक देण्यात आली आहे.
तर सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश निषेध मोर्चा देखील काढला जाणार आहे. दुपारी साडेतीन वाजता आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर या मोर्चाला संबोधन करणार आहेत.
संबंधित मुलगी तिचा भाऊ आणि तिची आई हे सर्वजण भिगवण बाजारपेठेमध्ये काही खरेदीसाठी आले होते. यावेळी आरोपींनी त्यांची गाडी अडवली आणि मुलीचा भाऊ व आई यांच्या डोळ्यात चटणी फेकली मुलीच्या आईला मारहाण केली. आणि आरोपी संबंधित मुलीला घेऊन पसार झाले आहेत.
What's Your Reaction?