आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकून भिगवण मधून भर दिवसा तरुणीच अपहरण ; दोघा सख्ख्या भावांचा प्रताप
निलेश मोरे,आय मिरर
पुण्याच्या भिगवण बाजारपेठेतून दुपारी चार च्या सुमारास दोघा आरोपींनी एका 21 वर्षीय मुलीच्या डोळ्यात चटणी फेकून तिचं अपहरण केलय. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जहीर हारून शेख आणि आयन हारून शेख अशी संशयित आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे मुलीचे अपहरण करणारे दोघे सख्खे भाऊ आहेत असही पोलिसांनी सांगितलं आहे.
संबंधित मुलगी तिचा भाऊ आणि तिची आई हे सर्वजण भिगवण बाजार पेठेमध्ये काही खरेदीसाठी आले होते. यावेळी संशयित आरोपींनी त्यांची गाडी अडवली आणि मुलीचा भाऊ व आई यांच्या डोळ्यात चटणी फेकली मुलीच्या आईला आणि भावाला मारहाण केली. आणि संशयित आरोपी संबंधित मुलीला घेऊन पसार झाले.
या संपूर्ण घटने प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. संबंधित तरुणीचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली असून काही पोलीस पथके देखील शोधासाठी रवाना केली आहेत. अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी ही दौंड तालुक्यातील असून तिचा काही दिवसात विवाह होणार होता. संबंधित मुलगी आज तिची आई आणि तिच्या भावासोबत भिगवण बाजारपेठेत काही खरेदीसाठी आली असता हा धक्कादायक प्रकार तिच्यासोबत घडला. दौंड तालुक्यातील दोघा संशयित आरोपींनी संबंधित मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकली आणि मुलीला घेऊन दोघे संशयित आरोपी फरार झाले.
हा संपूर्ण प्रकार भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित मुलीच्या नातलगाने आता भिगवण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे.
What's Your Reaction?