तो फेसबुक इंस्टावर बनावट खातं काढायचा, पोलिस असल्याचं सांगायचा अन् महिलांना लुटायचा ! अखेर भिगवण पोलिसांच्या जाळ्यात आलाचं

Nov 7, 2025 - 14:11
 0  1764
तो फेसबुक इंस्टावर बनावट खातं काढायचा, पोलिस असल्याचं सांगायचा अन् महिलांना लुटायचा ! अखेर भिगवण पोलिसांच्या जाळ्यात आलाचं

आय मिरर 

फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून महिलांशी ओळख करून त्यांची फसवणूक करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील गणेश शिवाजी कारंडे या सराईत गुन्हेगाराला पुण्याच्या भिगवण पोलिसांनी अकलूज मधून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत केलाय. 

गणेश शिवाजी कारंडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून एका महिलेला व्यावसायिक मदत करण्याचे आमिष दाखवून या आरोपीने त्या महिलेकडून दागिने व पैसे घेत तिची फसवणूक केली आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप गणेश कारंडे याच्यावर असून संबंधित पीडित महिने भिगवण पोलिसात कारंडे विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

कारंडे याच्यावर यापूर्वी अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर आणि लोणंद पोलीस ठाण्यांमध्ये महिलांवरील अत्याचार व फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई भिगवण पोलिस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कारंडे फेसबुकवर ‘संग्राम पाटील’ आणि ‘पृथ्वीराज पाटील’ याने बनावट प्रोफाइल तयार केले.यातून तो स्वतःला पोलिस अधिकारी आहे असं भासवत होता आणि यातून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेत असे.

आरोपीने पिडीत महिलेशी फेसबुक व्दारे ओळख करून तिला ब्युटी पार्लरसाठी बँकेतुन ६ लाख रूपये लोन काढुन देतो असे सांगितले. मात्र तुला माझ्या बायकोची बहीण म्हणुन सही करावी लागेल अशी अट घातली. दि.२३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी अकरा ते दोन च्या सुमारास मदानवाडी हदट्टीत एका लॉजमध्ये पिडीत फिर्यादी महिलेला घेवुन जावुन फिर्यादीचे जवळील ४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स व सहा हजार रोख रक्कम आणि मोबाईल असे पर्समध्ये ठेवण्यास सांगितले. 

बँकेमधील लोनच्या फॉर्मवर फिर्यादीच्या अंगावरील तिळ व खुणा दाखविण्यासाठी पीडितेला लॉजमध्ये नेवुन दमदाटी करून फिर्यादीचे सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. फिर्यादीचे नकळत बॅगमधील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम व मोबाईल असा एकुण ७३ हजार रू किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. या सर्व घटने प्रकरणी भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी पोलीस पथक आरोपीच्या शोध कामी रवाना केले.

तपास पथकामधील पोलीस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो आपले नाव बदलुन, पोलीस अधिकारी असल्याचे भासवुन अशाच प्रकारे महीलांची फसवणुक करीत असल्याची माहीती मिळाली. त्याचे आधारे आरोपीचा शोध घेत असताना तो अकलुज पोलीस स्टेशनचे हदट्टीत तो मिळून आला. त्याने मदनवाडी येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ल सदर गुन्हयाचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे करीत आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ के.सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे,पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, संतोष मखरे, प्रमोद गलांडे, गणेश पालसांडे, वैष्णवी राऊत भिगवण पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow