राष्ट्रवादीचा काटी गणाचा शिलेदार ठरला ! बापूराव शेंडेंना राष्ट्रवादी उतरणार मैदानात
आय मिरर
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवारी 16 जानेवारीपासून नामनिर्देशन अर्ज दाखल केले जाणार आहेत. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ काही तास उरले असल्याने इच्छुक कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
अद्याप पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृत पत्रकार परिषद घेत आपापल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नसली तरी काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले तर काटी पंचायत समिती गणासाठी वरकुटे खुर्द गावचे विद्यमान सरपंच बापूराव शेंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
बापूराव शेंडे हे वरकुटे खुर्द गावचे विद्यमान सरपंच असून माळी समाजाचे नेते म्हणून ही त्यांची ओळख आहे. शिवाय त्यांच्या सुविद्य पत्नी स्वाती शेंडे या इंदापूर पंचायत समितीच्या सभापती देखील राहिलेल्या आहेत. या पंचायत समिती गणा राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी चेहऱ्याला प्राधान्य दिल्याचा पाहायला मिळत आहे.
काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटासाठी श्रीमंत ढोले यासोबत बाबुराव शेंडे यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाल्याने भारतीय जनता पार्टी, हर्षवर्धन पाटील गट किंवा स्थानिक विकास आघाडी कडून या गटात नेमकं कोणाला मैदानात उतरवले जाते याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.
काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण तर काटी पंचायत समिती गण सर्वसाधारण आणि लाखेवाडी गण ओबीसी महिला आरक्षित झाला आहे.काटी गणात माळी समाजाचे मताधिक्य सर्वात जास्त आहे. माळी समाजाच्या खालोखाल मराठा समाजा आणि त्या खालोखाल धनगर समाज व इतर समाज येतो.राज्याचे कृषिमंत्री आणि इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांच्या तीनही विधानसभांच्या निवडणुकीत माळी समाजाने त्यांच्या पाठीशी आपले समर्थन दर्शवले. निमगाव केतकी भागातून माळी समाज ठामपणे मंत्री भरणे यांच्या पाठीशी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला.
पंचायत समिती निवडणुकीत काटी गणाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसने माळी समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याने या ही निवडणुकीत माळी समाज नेहमीच्या निवडणुकांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो का ? हे पाहणे ही महत्वाचे असेल.
What's Your Reaction?