प्रियदर्शिनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे इंटर स्कूल स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये नेत्रदिपक यश
आय मिरर
इंदापूर शहरातील प्रियदर्शिनी इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय,इंग्लिश मिडीयम स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत बारामतीत पार पडलेल्या इंटर स्कूल स्पोर्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये कराटे स्केटिंग व रनिंग या स्पर्धेमध्ये प्रियदर्शिनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे.
कराटे स्पर्धेतमध्ये आरहान शेख,अथर्व दिवसे ,वरद दिवसे,कु.ईश्वरी दिवसे, कु.सनम शेख,कु.परिशिष्टा धायगुडे या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडलची तर शिवतेज अनबोले, कु.आशिया शेख या विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत सिल्वर मेडल या पदकांची कमाई केली आहे.
तर स्केटिंग स्पर्धेमध्ये शिवांश फलफले,चैतन्य अंकुशे या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल आणि अथर्व देवकर,राजवर्धन कचरे या विद्यार्थ्यांनी ब्रांझ मेडल संपादन केले.रनिंग स्पर्धेत आदर्श गुप्ता याने सिल्वर मेडल तर शिव लवटे याने ब्रांझ मेडल पटकावले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री नायर ,व्हाईस चेअरमन इम्रान शेख,प्राचार्य सुधीर भिसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सचिन केंगार आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याचे अभिनंदन केले.
What's Your Reaction?