वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर इंदापूर पोलिसांची कारवाई...

Mar 6, 2026 - 07:32
Mar 6, 2026 - 07:42
 0  625
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर इंदापूर पोलिसांची कारवाई...

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूर पोलिसांनी इंदापूर शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली आहे. जवळपास 28 वाहन चालकांवर केलेल्या कारवाईतून इंदापूर पोलिसांनी 38 हजार पाचशे रुपयांचा दंड आकारला आहे.इंदापूर पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम राबविल्याने बेशिस्त वाहनचालकांचे धाबे चांगलेच दणाणल्याच पाहायला मिळालं.

इंदापूर पोलिसांनी गुरुवारी पाच मार्च रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर ही कारवाई केली. यामध्ये जसे की ट्रिपल सीट प्रवास करणे, विना नंबर प्लेट दुचाकीवरून प्रवास करणे, कर्कश्य आवाजाचा सायलेन्सर वापरून ध्वनी प्रदूषण करणे, हेल्मेटचा वापर न करणे, विना वाहन चालक परवाना प्रवास करणे यास अनेक मुद्द्यांवरून पोलिसांनी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहरात काही दुचाकीचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेफिकीरपणे वाहने चालवत आहेत. यामुळे इतर दुचाकी स्वारांसह शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय.

ही बाब लक्षात घेता इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने अचानक कारवाईचा बडगा उगारल्याने अनेक वाहन चालकांची दमछाट झाली.तर सर्वसामान्य  नागरिकांनी मात्र या कारवाईचे स्वागत केलं आहे.

इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांसह पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार प्रवीण भोईटे,पोलीस कॉन्स्टेबल अनिल नागरगोजे,अमोल खाडे,पद्मसिंह शिंदे,गणेश वाघमोडे,सुहास आरणे,अकबर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow