धार्मिक कार्यात विरोधकांनी राजकारण करू नये- राजवर्धन पाटील
आय मिरर (देवा राखुंडे)
मंदिरे ही सर्वांचे श्रध्दास्थान असतात,आयुष्याला धार्मिकतेची जोड दिली तर आयुष्य फुलून जाते. असे अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. यामध्ये काहीजण मुद्द्याम राजकारण करतात, मात्र विरोधकांनी यामध्ये राजकारण करू नये. असे प्रतिपादन नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले.
वकीलवस्ती येथे श्री महालक्ष्मी माता प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. यावेळी राजवर्धन पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले की,असे कार्यक्रम हे सर्वसमावेशक होत असतात. यामध्ये सर्व लोकं मोठ्या भावनेने सहभागी होत असतात. जेष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्वजण धार्मिक कार्यात मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात. अशा पंरपरा पुढेही कायम राहतील. बदलत्या काळात सगळं काही बदलत आहे, पण जुन्या परंपरा कायम राहतात त्या पुढे येतात तेव्हा मोठं समाधान मिळत.
अशा धार्मिक कार्यक्रमात सर्वांनी मनोभावे सहभागी व्हावे, असेही राजवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने राजवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
What's Your Reaction?