इंदापूरच्या श्रावणी शितापणे जिंकलं ज्युदो स्पर्धेत गोल्ड मेडल...
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर मधील श्रावणी प्रशांत शिताप हिने मध्यप्रदेशातील भोपाळ मध्ये पार पडलेल्या वेस्ट झोन आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत गोल्ड मेडल पदक जिंकलय. तिची अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इंदापूर मधील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप यांची श्रावणी कन्या असून तिच्या यशाचं सर्वदूर कौतुक होतं आहे.
नुकतीच मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये साऊथ वेस्ट झोन अंतर विद्यापीठ जुदो स्पर्धा पार पडली. श्रावणी शिताप हिने या स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून नेतृत्व केले. तिने ५२ किलो वजन गटात गोल्ड मेडल पथकाची कमाई केली आहे.
श्रावणी शिताप ही इंदापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रशांत शिताप यांची कन्या असून इंदापूर ज्युडो कराटे असोसिएशनचे दत्तात्रय व्यवहारे तिला या संदर्भातील प्रशिक्षण देत आहेत.मागील वर्षी कुराश मध्ये मार्गदर्शक दत्तात्रय व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने दोन राष्ट्रीय मेडल पदके मिळवली होती.
श्रावणीच्या या भरघोस यशाबद्दल राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील श्रावणीच अभिनंदन केलं आहे. सध्या श्रावणी एस आय ए गोवा या ठिकाणी सराव करत असून तिच्या कोच कौर तिला सध्या प्रशिक्षण देत आहेत. श्रावणी शितापची अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धे साठी तिची निवड झाली आहे.
What's Your Reaction?