18 महिन्यापासून वालचंदनगर पोलिसांना गुंगारा, बहुचर्चित उत्तम जाधव खून प्रकरणी सोमनाथ पवार अखेर जेरबंद
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील उत्तम जाधव खून प्रकरणातील फरार आरोपी सोमनाथ पवारला वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ पवार हा आरोपी गेल्या 18 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. पोलिसांनी कळंब परिसरतून त्याला सापळा रचून ताब्यात घेतलं. आरोपीवर मोक्का कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने सोमनाथ पवारला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इंदापुर तालुक्यातील निमसाखर येथील बहुचर्चित उत्तम जाधव खुन प्रकरणातील राजु भाळे टोळीचा सदस्य व दीर्घ काळापासन फरार असलेला आरोपी सोमनाथ बबन पवार, रा. कळंब, ता. इंदापुर, जि. पुणे हा गेले १८ महिन्यापासुन अटकेच्या भितीने तो वेळोवेळी पोलीसांना गुंगारा देत वेशभुषा बदलुन स्वतःला अटकेपासून वाचविण्यासाठी फरार झाला होता.
सदर आरोपीवर बेकायदेशीर टोळीचा सदस्य बनुन गुन्हा केल्याने त्याच्यावर मोक्का कायदाअंर्तगत कारवाई करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा गुपचूप कळंब, ता. इंदापुर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकामधील अंमलदार यांना मिळाली.
त्या अनुषंगाने सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकामधील अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी वेशभुषा बदलुन सापळा रचुन आरोपी हा कळंब मध्ये येताच त्यास शिताफीने ताब्यात घेत त्यास जेरबंद केले.
सदर आरोपीस अटक केल्यानंतर त्यास विशेष मोका न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे रिमांडकामी हजर केले असता आरोपीस न्यायालयाने दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे,पोलीस हवालदार आप्पा दराडे, किर्तीलाल गायकवाड, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर, राहुल माने यांनी केली आहे.
What's Your Reaction?