ठरलं..! 19 जानेवारीला हर्षदा जाधव दाखल करणार उमेदवारी ; दीपक जाधव मित्रपरिवाराकडून मोठं शक्ती प्रदर्शन

Jan 16, 2026 - 09:02
Jan 16, 2026 - 10:35
 0  615
ठरलं..! 19 जानेवारीला हर्षदा जाधव दाखल करणार उमेदवारी ; दीपक जाधव मित्रपरिवाराकडून मोठं शक्ती प्रदर्शन

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून राष्ट्रवादीचे फायर नेते दीपक जाधव यांच्या पत्नी हर्षदा दीपक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता हर्षदा जाधव यांची उमेदवारी दाखल केली जाणार आहे. 

उमेदवारी दाखल करण्यापूर्वी दीपक जाधव मित्रपरिवाकडून मोठे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. गलांडवाडी नंबर एक येथील जाधव यांच्या निवासस्थानापासून इंदापूर तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. या भव्य रॅलीमध्ये हजारो जाधव समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

आज शुक्रवार 16 जानेवारी पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरता प्रत्यक्षात नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. 19 जानेवारी रोजी हर्षदा दीपक जाधव या आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

अद्याप पर्यंत भाजप कडून जाधव यांच्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवार गुलदस्त्यात ठेवण्यात आलाय. त्यामुळे हर्षदा जाधव यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा कोण तगडा उमेदवार असेल याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

हर्षदा जाधव यांची उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर नेते दीपक जाधव यांनी गाव भेट दौरे सुरू केले असून कोपरा बैठकींच्या माध्यमातून जाधव यांनी प्रचाराचा धडाका लावलाय. याशिवाय सर्वच जाधव कुटुंबीय विभागून जिल्हा परिषद गटातील गावे पिंजून काढताना पहायला मिळत आहेत. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow