गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई

Sep 25, 2026 - 07:11
Sep 25, 2026 - 07:17
 0  97
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई

आय मिरर 

गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे 34 सराईत गुन्हेगारांवर यवत पोलिसांनी हद्दपारची कारवाई केली आहे.

या गुन्हेगारांवर यापूर्वी विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रभारी अधिकारी संतोष तासगावकर यांनी दिली आहे. 

गणेशोत्सवाच्या काळात शांतता आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी संबंधित गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर 34 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव धडस यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर,पोलीस उप-निरीक्षक मारोती मेतलवाड, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोलीस उप-निरीक्षक पांडुरंग बनकर,

यवत पोलीस स्टेशन कडील पोहवा संदिप देवकर, पोहवा महेंद्र चांदणे, पोहवा रॉकी देवकाते, पोहवा नो पो.कॉ. अमोल भुजबळ, पोकॉ प्रतिक जगताप, पो.कॉ. मारूती बाराते, पो.कॉ. सचिन गुंड, पो.कॉ. धिरज जाधव, पो.कॉ. दिनेश लोणकर, पो.कॉ. हाडे यांचे पथकाने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow