म्हणून प्रशासनाला दाखल करावा लागला शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांविरोधात गुन्हा...
आय मिरर
खाटीक समाजाविषयी बेताल वक्तव्य केल्यामुळे जालनाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या वरती बारामती पोलिसांनी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बारामती पोलिसांनी भिगवण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला असून तो तपास कामी जालना पोलीस दलाकडे देखील वर्ग केला आहे.
15 ऑगस्ट पासून बारामती मधील प्रांताधिकारी कार्यालया बाहेर खाटीक समाजाकडून अर्जुन खोतकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी खाटीक संघटने कडून बेमुदत उपोषण करण्यात आलं होतं. हिंदू खाटीक संघटनेचे कार्याध्यक्ष आणि उपोषणकर्ते सुनील इंगुले यांच्या तक्रारीवरून जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर हा गुन्हा जालना येथे तपास कामी वर्ग देखील करण्यात आलेला आहे.
नेमका विषय काय...
अर्जुन खोतकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी हिंदू खाटीक समाज संघटनेचे कार्याध्यक्षांनी बारामती शहर पोलिस ठाण्यासह उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं होत. या निवेदनात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
मात्र पोलिसांकडून कोणतीच ठोस पावलं उचलली जात नसल्याने 15 ऑगस्ट पासून बारामती प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर हिंदू खाटीक संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील इंगुले यांनी उपोषण सुरू केले होते.खोतकर यांच्या विधानावरून राज्यभर खाटीक समाज आक्रमक झाला होता.
राज्यात 22 पोलिस ठाण्यात कोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदने देण्यात आली होती. अखेर बारामती पोलिसांनी भिगवण पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करीत तो आता जालना पोलीस विभागाकडे वर्ग केला आहे त्यामुळे कोतकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
What's Your Reaction?