पुरंदरच्या नीरा मध्ये राडा...मराठा आंदोलक अन् लक्ष्मण हाके आमनेसामने ! हाकेंचा हल्ला झाल्याचा दावा
आय मिरर
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद कडे जात असताना लक्ष्मण हाके हे निरा येथे चहा घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते याबाबतची माहिती मराठा तरुणांना मिळताच हॉटेलच्या बाहेर येऊन मराठा तरुणांनी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत या यात मध्यस्थी केली.
मनोज जरांगे यांच मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर मराठा तरुण संतप्त आहेत.त्यातच लक्ष्मण हाके हे मराठा आंदोलकांच्या विरोधात बोलत आहेत. यातूनच हाके यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली आहे.
यावेळी लक्ष्मण हाके यांनी थेट रस्त्यावर बसूनच या सगळ्या विरोधी आंदोलनाचा निषेध व्यक्त केला. तर येळकोट येळकोट जय मल्हार आशा घोषणाही देण्यात आल्या. एकूणच दोन्ही बाजू कडून यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली.
नीराकडून लोणंदच्या दिशेला जात असताना माझ्यावर हल्ला झाला, असा मोठा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. नीरा गावाजवळ हा हल्ला झाल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. आपण चहा पिण्यासाठी थांबलेलो असताना आपल्यावर हल्ला झाला, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. खरंतर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांचा एकमेकांना भिडण्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत हल्ला झाल्याचं स्पष्ट दिसत नाही. पण लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात तू तू मैं मैं होताना दिसत आहे. या घटनेनंतर लक्ष्मण हाकेंनी आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केला आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. हाके हे नीरा येथील एका हॉटेलमध्ये थांबले असताना ही घटना घडली. मराठा तरुणांना याची माहिती मिळताच त्यांनी हॉटेलबाहेर जमून हाके यांच्याविरोधात घोषणा दिल्या. तातडीने पोलिसांनी यात मध्यस्थी केल्याने वाद चिघळला नाही.
नीराकडून लोणंदच्या दिशेने जात असताना निरा येथे चहा पिण्यासाठी थांबलेले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक भिडले. पुणे जिल्ह्यातील नीरा या गावी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मराठा आंदोलक भेटले. हाके यांचा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामध्ये बोरी या गावी एक कार्यक्रम होता. त्यासाठी ते निघाले होते. पण नीरा येथे थांबले असताना लक्ष्मण हाके यांच्यासमोर काही मराठा आंदोलक आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मराठा आंदोलकांनी हाके यांचे आरोप फेटाळले...
आम्ही हाकेंवरती अजिबात हल्ला केला नाही. मराठा क्रांती मोर्चा चे आम्ही दहा-पंधरा कार्यकर्ते होतो, आम्ही त्यांना केवळ जाब विचारण्यासाठी गेलो होतो. आम्ही गरजवंत मराठे आहोत आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आपण मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलत आहात,तुम्ही अशा पद्धतीने वागू नका आम्हाला आरक्षणाची गरज आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातून लाखो मराठा सैनिक मुंबईमध्ये उपोषणाला बसले आहेत.
हाके यांनी चुकीचा गैरसमज करून घेतला आहे आम्ही त्यांच्यावर हल्ला केला नाही. आम्ही त्यांच्याजवळ पोहोचलो देखील नाही. त्यांच्यासोबत आठ ते दहा पोलीस आहेत ते मध्यस्थी करत होते. एवढे पोलीस असताना आमची ताकद होऊ शकत नाही आम्ही फक्त त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. या पलीकडे दुसरी कुठलीही गोष्ट घडली नाही. आम्ही तिथे एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या या पलीकडे कुठलीही घोषणा दिली नाही.
What's Your Reaction?