उजनीच्या 16 दरवाज्यातून भीमापात्रात 41 हजार 600 क्युसेकने विसर्ग
आय मिरर
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. सायंकाळी पाच वाजल्यापासून उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदी पात्रात 41 हजार 600 क्युसेक इतक्या दाबाना पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय.
उजनी धरण साखळीतील वरील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे उजनी धरण व्यवस्थापनाने देखील भीमा नदी पात्रात आज दुपारी बारा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
सुरुवातीला हा विसर्ग 6 हजार 600 क्युसेक दाबाने होता पुढे त्यामध्ये वाढ करून तो 11,600 क्युसेक करण्यात आला त्यानंतर आता सायंकाळी पाच वाजल्यापासून यामध्ये वाढ करून तो 26 हजार सहाशे क्युसेक इतका करण्यात आला, त्यानंतर यामध्ये वाढ करून तो 41 हजार 600 इतका करण्यात आला आहे.
सध्या दौंड मधून भीमा नदीपात्रात 9000 क्युसेक इतक्या दाबाने पाण्याचा प्रवाह येतोय उद्या सकाळपर्यंत हा प्रवाह जवळपास 70 हजार क्युसेक इतका होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे उजनी धरणातून देखील उद्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
उद्या सकाळी उजनीतून सुरू असणारा विसर्ग वाढवला जाऊ शकतो असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
What's Your Reaction?