इंदापूरच्या पोंधवडीत विहिरीत आढळले मायलेकींचे मृतदेह, भिगवण पोलीसात दाखल होती हरवल्याची तक्रार

Dec 2, 2023 - 21:46
Dec 2, 2023 - 21:47
 0  1234
इंदापूरच्या पोंधवडीत विहिरीत आढळले मायलेकींचे मृतदेह, भिगवण पोलीसात दाखल होती हरवल्याची तक्रार

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावात एका विहिरीत मायलेकींचे मृतदेह आढळून आले आहेत.धनश्री केतन मदने वय 31वर्षे आणि परी केतन मदने वय दीड वर्षे अशी मृतांची नावे असून या दोघी मायलेकी इंदापूर तालुक्यातील पोंधवडी येथील पवारवस्ती वरील रहिवासी आहेत.

भिगवण पोलीस ठाण्यामध्ये मयत धनश्रीचे वडील नामदेव जंगलु कोकरे रा. खातगाव ता. करमाळा जि. सोलापूर यांनी दि.३० नोव्हेंबर रोजी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर शनिवारी पोंधवडीतील पवारवस्ती परिसरात एका विहिरीत या दोघींचे मृतदेह आढळुन आले. घटना समजताच घटनास्थळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा.पो.निरीक्षक दिलीप पवार, पो.उपनिरीक्षक रुपेश कदम, विक्रम जाधव, पोलीस अंमलदार महेश उगले, अंकुश माने, गलांडे, गडदे आदी भेट दिली.भिगवण पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह पुणे येथील शासकीय रुग्णालयात पाठवले असून अधिक तपास केला जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow