मंगेश काळोखेंना संपवण्यासाठी किती रुपयांची सुपारी घेतली? आरोपींनी सांगितला भयानक आकडा
आय मिरर
खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. मंगेश काळोखी यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे त्यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर येत असून काळोखे यांना संपवण्यासाठी घेतलेल्या सुपारीचा आकडा समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
खोपोलीमधील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणातील आरोपींनी काळोखे यांचा सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली आहे. या धक्कादायक माहितीनंतर आता रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगेश काळोखी यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे त्यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिलीय.
किती रुपयांची सुपारी घेतली?
आज मंगेश काळेखे यांच्या हत्येला तब्बल नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. काळोखे यांच्या हत्येवेळी त्यांच्या मुलींना देखील मारण्याचा प्लान हल्लेखोरांचा असल्याचा दावा मुलींनी केली आहे. हल्लेखोरांनी काळोखे यांना संपवण्यासाठी किती रक्कम घेतली होती, याची माहिती अद्याप समोर आली नव्हती. अखेर ही माहिती समोर आली असून काळोखे यांनी संपवण्यासाठी हल्लेखोरांनी तब्बल २० लाखांची सुपारी घेतली होती.
पोलिस अधिक्षकांनी काय माहिती दिली?
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नाही. मात्र त्याबाबत तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यात असल्याचं पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितलं आहे. 26 डिसेंबर रोजी आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मंगेश काळोखे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. कॉन्ट्रॅक्ट किलिंगची ही घटना असून देवकर यांनी सुपारी देऊन पाच जणांना बोलावलं आणि हा गुन्हा केला.त्यातील दोन आरोपी दर्शन देवकर आणि महेश धायतडक आरोपींनी कबुली दिली आहे.
What's Your Reaction?