धक्कादायक | भरदिवसा कापूरहोळ परिसरातून व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण, जेजुरी पोलीस अन् ग्रामस्थांनी असा गेम केला

Mar 3, 2026 - 18:01
Mar 3, 2026 - 18:03
 0  2243
धक्कादायक | भरदिवसा कापूरहोळ परिसरातून व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण, जेजुरी  पोलीस अन् ग्रामस्थांनी असा गेम केला

आय मिरर 

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कापूरहोळ परिसरात आज दुपारी खळबळजनक घटना घडली आहे. एका नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आले होते. मात्र जेजुरी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या मुलाची काही वेळातच सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे.

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस करत आहेत. अपहरणामागील नेमकं कारण काय, आरोपी कोण आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारी कापूरहोळ येथून XUV कारमधून या तरुणाच अपहरण करण्यात आलं. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारेही मुलाच्या वडिलांनी मदतीसाठी संपर्क साधला.

माहिती मिळताच जेजुरी पोलिस आणि निरा पोलिसांनी जेऊर व निरा परिसरात तात्काळ नाकाबंदी केली. या दरम्यान संशयित वाहनाचा शोध सुरू असताना जेऊरकडून पिसुर्टी कडे जाणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली.पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला असता, रस्ता अरुंद असल्याने ती कार उसाच्या शेतात जाऊन अडकली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow