त्यांनी कोयत्याने वार करीत प्रेमी युगलाला लुटलं ! मग चंद्रशेखर यादवांनी केला करेक्ट कार्यक्रम तिघांना दाखवली जेलची हवा
आय मिरर
बारामतीतील तांदुळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल बारामती तालुका पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे.
प्रसाद गणपत भोसले वय २४ वर्ष, धैर्यशील प्रशांत आगवणे वय १९ वर्ष व कृष्णा नाना गाडेकर वय २१ वर्ष या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून हे सर्वजण बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथील रहिवासी आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस चौकशीदरम्यान आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बारामती तालुक्यातील तांदुळवाडी विमानतळ रोड लगेच एका मोकळ्या जागेत एक प्रेमी युगल गप्पा मारत बसले होते. याच दरम्यान रात्री पावणे नऊच्या सुमारास तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमाने त्यांच्याजवळ येत लोखंडी सतुर कोयत्याचा धाक दाखवून पैशाची मागणी केली.प्रेमी युगलाने विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादी तरुणाच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले होते.
त्यानंतर आरोपींनी सोन्याची तीन लाख रुपये किंमतीची २१ ग्रॅम वजनाची चैन, पाच हजार रुपये किमतीची चांदीची अंगठी, पंधरा हजार रुपये किमतीची चांदीची चैन,आणखी एक दोन हजार रुपये किमतीचे चांदीची अंगठी व २ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला व 'परत इकडे यायचं नाही' अशी धमकी देत ते घटनास्थळावरून पसार झाले होते.याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात येथे बी.एन.एस कलम ३०९(६),३(५) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ भारत खारतोडे मनोज पवार जितेंद्र शिंदे राजू बन्ने व पथकाने केली.
What's Your Reaction?