बिग ब्रेकिंग | वीर धरणातून नीरा पात्रात 47 हजार 350 क्यूसेकने विसर्ग

Aug 19, 2025 - 19:22
Aug 19, 2025 - 19:23
 0  377
बिग ब्रेकिंग | वीर धरणातून नीरा पात्रात 47 हजार 350 क्यूसेकने विसर्ग

आय मिरर, राहुल शिंदे 

वीर धरणातून नीरा नदी पात्रात सुरू असणारा विसर्ग वाढवण्यात आलाय संध्याकाळी सात वाजल्यापासून वीर धरणांमधून निरा नदी पात्रात 47 हजार 350 क्यूसेक इतक्या दाबाने विसर्ग सुरू आहे. 

वीर धरणाच्या धरण साखळीत ही पावसाचा जोर कायम असल्यानं वीर धरणातून नीरा नदी पात्रात संध्याकाळी सात वाजल्यापासून विसर्ग वाढवण्यात आलाय.

नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून भाटघर, निरा देवघर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे.

 

पूर परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी वीर धरणा मधून नीरा नदीच्या पात्रात आज सायंकाळी सात वाजल्यापासून 47 हजार 350 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येतोय. तर प्रशासनांन नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow