Jejuri : माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी

Feb 12, 2025 - 15:25
Feb 12, 2025 - 15:26
 0  108
Jejuri : माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी

आय मिरर

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या यात्रेनिमित्त निमित्त जेजुरी गडावर श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ मोठ्या यात्रा भरतात .माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त नाशिक,संगमनेर, नगर,बारामती,सातारा या भागातील भाविक आपल्या मानाच्या शिखरकाठी देवभेटी साठी घेवून येतात.

माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त भाविकांनी पहाटे पासूनच देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देवदर्शन तसेच कुलधर्म कुळचार नुसार तळी भंडार, जागरण गोंधळ आदी विधींचे रेलचेल पाहण्यास मिळत आहे.  

गुरुवार दिनांक 13 रोजी संगमनगर येथील होलमराजा,सुपे येथील खैरे व होळकर व गावोगावच्या मानाच्या शिखरकाठी देव भेटीचा सोहळा जेजुरी गडावर रंगणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow