Big Breaking सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पहिली अटक ; पोलिसांनी बनकरच्या मुसक्या आवळल्या

Oct 25, 2025 - 09:58
Oct 25, 2025 - 10:06
 0  1304
Big Breaking सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पहिली अटक ; पोलिसांनी बनकरच्या मुसक्या आवळल्या

आय मिरर 

साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर ला पुण्यातून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.तो मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता.

अटक करण्यात आलेला आरोपी प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर फलटणमध्ये ज्या घरामध्ये राहत होती त्या घरमालकाचा मुलगा आहे. पोलिस उपनिरीक्षकासह प्रशांत बनकरने देखील डॉक्टरला त्रास दिला होता. गोपाल बदने आणि प्रशांत बनकरच्या त्रासालाच कंटाळून महिला डॉक्टरने आयुष्य संपवले. गुरूवारी महिला डॉक्टरने फलटण मधील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवले आहे.

या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि फाशी देण्यात यावी अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणामुळे राजकारण देखील तापले आहे. या प्रकरणात काही राजकीय नेत्यांवर देखील आरोप केले जात आहेत.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला असताना, या प्रकरणाला नवनवीन वळण मिळत आहे. तातडीने या प्रकरणातील आरोपीला अटक करावी अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. सत्ताधारी आणि विरोधक या सर्वांनीच या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. 

यानंतर पोलीस कारवाईला वेग आला होता या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आला आहे. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात फलटण पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांनी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.या दोघांचाही पोलीस शोध घेत होते अखेर या प्रकरणात एकाला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलय.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. कायद्याचे रक्षकच भक्षक निघाल्याचं या घटनेतून महाराष्ट्रा समोर आले विशेष म्हणजे आत्महत्या पूर्वी डॉक्टर मुंडे यांनी आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली होती आणि यामधून खळबळ जनक घटना महाराष्ट्र पुढे आली होती.

आत्महत्येपूर्वी डॉक्टर मुंडे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावं होती. या दोघांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा तसंच बलात्कार केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या दोघांविरोधात शुक्रवारी फलटण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार होते. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली होती.

सध्या पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सुसाईड नोट, कॉल रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण साताऱ्याला हादरवून सोडलं आहे. प्रशांत बनकरच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील सत्य उघडकीस येण्याची आणि न्याय मिळण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow