अन् असा उघड झाला 'सुदर्शन'चा कारनामा ! वाचा भिगवणमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या गर्भवती महिलेच्या खुनाची इनसाइड स्टोरी
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाच्या हद्दीत 22 ऑक्टोबर रोजी मदनवाडी पुलाखालील पाण्यात एका गर्भवती महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती.मात्र केवळ 24 तासाच्या आत या महिलेची ओळख पटवण्यात आणि तिच्या मारेकऱ्याला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि भिगवण पोलिसांना यश आला आहे.
दिपाली सुदर्शन जाधव वय 30 वर्ष असं खून झालेला महिलेचे नाव असून ते बारामती तालुक्यातील कटफळ येथे आहे. मृत महिलेच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून तिचा पती सुदर्शन उर्फ रविराज रणजीत जाधव वय 36 वर्षे, रा. कटफळ ता. बारामती यानेच 14 ऑक्टोंबर रोजी डोक्यात लोखंडी हत्याराने घाव करून महिलेचा खून केल्याचं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून भिगवण येथील मदनवाडी पुलाच्या खालील पाण्यात फेकून दिल्याचं पोलीस तापासात समोर आलय आरोपीला भिगवण पोलिसांनी अटक केली असून 31 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार च्या सुमारास भिगवण तालुक्यातील मदनवाडी येथील पुलाखाली कुजलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. अखेर या खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आला आहे. या महिलेचा मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून तिचा पतीच हत्यारा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून पत्नीच्या विवाहबाह्य मंदाच्या संशयातून पतीने ही हत्या केल्याचं कबूल केलं आहे.
पत्नीच्या विवाह बाह्य प्रेमसंबंधामुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला हा वाद टोकाला केला आणि रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडाने मारून तिचा खून केला.पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नीचा मृतदेह ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून तो इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील पुलाखाली फेकून देण्यात आला होता असं पोलीस तपासात समोर आलय.
कोणतेही धागेदोरे नसताना आणि पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असताना या गुन्ह्याचा शोध लावणे पोलिसांपुढे आव्हान होतं. मात्र अशातच त्या महिलेच्या हातावरती रविराज असा टॅटू होता आणि या टॅटूमुळेच या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आणि त्यानंतर पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले.
बायकोचा खून केल्यानंतर पोलिसात नोंदवली हरवल्याची तक्रार...
बायकोचा खून केल्यानंतर आरोपी पतीने आपली बायको हरवल्याची तक्रार देखील पोलिसात दाखल केली होती. मयत महिलेच्या हातावर रविराज असा टॅटू होता. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता स्वतः नवराच मारेकरी निघाल्याचे समोर आले आहे. 12 ऑक्टोबर रोजी पती-पत्नीमध्ये वाद झाले होते यातूनच तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ब्लँकेट मध्ये गुंडाळून तिला फेकून देण्यात आलं होतं हे पोलीस तपासात समोर आलं.
असा लागला खुनाचा छडा...
पोलिसांनी महिलेच्या हातावरील गोंदण असलेला फोटो आजूबाजूच्या पोलिस ठाण्यांमध्ये प्रसारित केला. जेणेकरून या मृत महिलेची ओळख होते. याच दरम्यान गोंदण असलेला मृतदेह हा दिपाली सुदर्शन जाधव रा. कटफळ ता. बारामती जि पुणे यांचा असण्याची शक्यता आहे. त्यांचे हातातवर रविराज नावाचे गोंदण आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी संशोध महिलेचा शोध घेतला असता सदर महिलेचा पती सुदर्शन उर्फ रविराज रणजीत जाधव यांनी त्याची पत्नी दिपाली सुदर्शन जाधव ही हरवली असल्याची तक्रार 14 ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात नोंदवल्याच समोर आलं. त्यानंतर हा मृतदेह सुदर्शन उर्फ रविराज जाधव याची पत्नी दिपाली जाधव हिचा असल्याची ओळख पटली.
पोलिसांनी याबाबत सुदर्शन उर्फ रविराज रणजीत जाधव याच्याकडे चौकशी केली असता तपासामध्ये पोलिसांना विसंगती आढळून आली त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता पत्नी दिपाली जाधव हिचे विवाहबाह्य प्रेम संबंध असल्याचा संशय त्याला होता. दिपाली ही गर्भवती असल्याने तिच्या पोटातील बाळावरून सुदर्शन उर्फ रविराज जाधव आणि दिपाली जाधव यांच्यात 12 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता कटफळ येथील राहत्या घरी भांडण झाले.
वाद निकोपाला गेला आणि सुदर्शन जाधवने दिपालीच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारली आणि तिचा खून केला.पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह ब्लँकेट मध्ये गुंडाळून तो भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील मदनवाडी येथील पुलाच्या खाली पाण्यात फेकून देण्यात आला की माहिती समोर आली.पोलिसांनी आरोपी सुदर्शन ऊर्फ रविराज रणजित जाधव याला अटक केली असून न्यायालयाने 31 ऑक्टोबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे मार्गदर्शनाखाली,पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर भट्टे यांचे सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवण पो स्टे चे स.पो.नि. विनोद महांगडे, स्था.गु.शा.चे सपोनि कुलदीप संकपाळ, पोसई बाळासाहेब कारंडे, स्था.गु.शा.चे अंमलदार अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीबळे, अतुल डेरे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, अजय घुले, निलेश शिंदे, अजय देडे, भिगवण पो स्टे चे अंमलदार सचिन पवार, महेश उगले, रामदास करचे, संतोष मखरे, गणेश करचे, आप्पा भांडवलकर, रणजित मुळीक, मयुर बोबडे, विठ्ठल वारघड, वर्षा जामदार, कविता माने,पो पाटील शामल पवार यांनी केली असून पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशन करत आहेत.
What's Your Reaction?